पावा शाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
(भंडारा)- आज स्पर्धेच्या युगात वावरत असतांना विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानाबरोबरच चांगल्या – वाईट गोष्टी विषयी माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच महिला शोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच नंदगोपाल फाऊंडेशन ने क्लीन भंडारा उपक्रमांतर्गत पावा नवीन मुलींची शाळा दत्तक घेतली आहे. ह्याप्रसंगी शाळेला स्वच्छता उपयोगी साहित्य भेट देण्यात आली. शाळा कचरामुक्त करण्याचा ध्येय ठेवून शाळेत मागील वर्षापासून नंदगोपाल फाउंडेशनचे अतिशय महत्त्वाचे कार्य सुरु आहे. हे आमच्या शाळेसाठी आनंदाची बाब आहे. असे प्रतिपादन न्यु गर्ल्स संस्थेचे अध्यक्ष ॲड एम. एल. भुरे यांनी केले.
ते पावा नवीन मुलींची शाळा येथे रोटरी क्लब भंडारा व नंदगोपाल फाउंडेशन च्या वतीने “मेन्सट्रूअल हायजिन व गुड टच ॲड बॅच टच” या विषयावर किशोरवयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यु गर्ल्स संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम.एल. भुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. योगेश जिभकाटे, स्त्री रोगतज्ञ डॉ. विनया देवळे (लांजेवार), कार्यवाह शेखर बोरसे, शाळेच्या माजी विद्यार्थीनी नेत्ररोगतज्ञ् डॉ. विशाखा जिभकाटे, नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार, पर्यावरण मित्र विलास केजरकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक चुटे, मुख्याध्यापिका सुनिता पटोले (हुकरे), राजू बारई, ॲड. निता चुटे, शिक्षकवृंद, नंदगोपाल फाउंडेशनचे पदाधिकारी रोटरी क्लबचे पदाधिकारी व पावा नविन मुलींची शाळेतील शिक्षिका -शिक्षक उपस्थित होते.
वयानुसार शरीरात होणारे बदल व व त्यांची काळजी, त्यानंतर समाजात वावरतांना नकोसा स्पर्श व चांगला स्पर्श ह्या बाबतीत माहिती दिली. समाजात वावरताना घरच्या व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून सुद्धा काही मुलींना नकोसा स्पर्षाला सामोरे जावं लागतं, त्याची जाणीव मुलींना असणे गरजेचे आहे. मुलींना जर ह्या गोष्टींची जाणीव असली तर लगेच आपल्या पालकांना याची माहिती करून देतील व घाबरणार नाहीत. असे मत स्त्री रोगतज्ञ डॉ. विनया देवळे यांनी व्यक्त केले.
नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार यांनी निरोगी आरोग्यासाठी पर्यावरण संतुलित राहणे आवश्यक असून त्यासाठी स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका सुनिता पटोले (हुकरे) यांनी नंदगोपाल फाऊंडेशनची कार्ये व कार्यप्रणाली बद्दल सविस्तर माहीती दिली. शाळेच्या माजी विद्यार्थीनी नेत्ररोगतज्ञ डॉ. विशाखा जिभकाटे यांनी आपल्या उदबोधनात शाळेच्या आठवणींना उजाळा देऊन शाळेच्या गौरवशाली परंपरेबद्दल अभिमान व्यक्त केला.
रोटरी क्लब ही सामाजिक संस्था असून जिल्ह्यात विविध अतिशय महत्त्वाचे कार्य करणे सुरु आहे. आणि गरजेनुसार आम्ही सहकार्य करत असतो असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. योगेश जिभकाटे यांनी केले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना स्वच्छतेला जीवनात किती महत्व आहे हे विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामली नाकाडे व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता हुकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनिषा वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रवि पडोळे, रोझी गणवीर, निलेश्वरी नेवारे, गायत्री यल्लजवार, माही अरखेल, श्रेया बान्ते, कुमूद हेडाऊ, माही सोनवाने, ऐंजल मालाधरे, पुनम गायधने, तेजस्वरी निखार, राणी राहांगडाले, वनिता खोकले, मनोज लांजेवार, भावेश बावनकुळे, प्रेमालाल मलेवार, विलास खोब्रागडे, रंजित खंगार, शरद हाके, अंशु राऊत, योगिता काटेखाये, राणू करनाहके व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी- किशोरवयीन विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

