सह्याद्री प्रतिष्ठान धोडप किल्ल्यावर सागवानी (कवाड) दरवाजा बसवणार..

0
126

सुरेखा गांगुर्डे, देवळा तालुका प्रतिनिधी – सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कडून महाराष्ट्रात गेली १६ वर्षापासुन अविरत दुर्ग संवर्धनाचे काम चालू आहेत. “स्वराज्याचे प्रवेशद्वार ” अंतर्गत आपल्या कळवण तालुक्यातील धोडप किल्ल्यावरील अंधारा दरवाजाला सागवानी (कवाड) बसवण्यात येणार आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची अणि अभिमानाची गोष्ट आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक जिल्हा मधील दुर्ग सेवकांनी यापुर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा हरीहर,रामशेज व इगतपुरी येथील त्रिंगलवाडी किल्ल्यावर असे एकूण ४ सागवानी प्रवेशद्वार बसवलेले आहेत अणि महाराष्ट्रात ३२ असे सागवानी दरवाजा, अनेक तोफांना सर्वानी तोफगाडे लावलेले आहेत. अनेक अपरिचित अश्या गडकिल्ल्यांवर एतिहासिक वास्तुंच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराचे काम केली आहेत अणि अनेक ठिकाणी काम चालू आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी आपल्या कळवण तालुक्यातील धोडप किल्ल्यावर सागवानी दरवाजा बसवण्याच काम या निष्ठावान दुर्ग सेवकांकडुन करण्यात येणार आहे, तरी आपल्या कसमादे नाशिक जिल्हा मधील सर्व शिव प्रेमी शिवभक्तांना या कार्यात सहभागी होण्यासाठी आर्त हाक दिली आहे, किल्ल्यावरील दरवाजा दरवाजा (कवाड) बसवण्याचे काम हे नाशिक जिल्हा वनविभाग व कळवण वनविभाग यांच्या परवानगीने होत असून यासाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून उभा करण्यात येणार आहेत. तरी कळवण मालेगाव, बागलाण ,चांदवड, देवळा नाशिक जिल्हा परिसरातील शिवभक्तांनी ,दुर्ग प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या पावित्र कार्यात सहभागी होऊन आर्थिक स्वरुपात हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.शक्य असल्यास मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here