वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे- डॉ. यशवंत लांजेवार

0
59

महिला अध्यापक जागतिक वसुंधरा दिन साजरा

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – सूर्यमालिकेत अनेक ग्रह असले, तरी आजपर्यंत पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवन असल्याचे निश्चितपणे सिद्ध झालेले नाही. पृथ्वी हा ग्रह सूर्यापासून अशा अंतरावर आहे की, तेथे पाणी द्रव स्वरूपात राहू शकते. तापमानही खूप जास्त किंवा खूपच कमी नसल्यामुळे जीवन टिकण्यासाठी योग्य स्थिती निर्माण होत असते. ही स्थिती खगोलशास्त्रीय भाषेत ‘गोल्डी लॉक झोन’ म्हणून ओळखले जाते.निसर्गाच्या चक्रात काही प्रजाती नष्ट होतात. तर काही नव्या प्रजाती निर्माण होतात. मात्र अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक प्रवाहच विस्कळीत होत असून प्रजातींचा पृथ्वीवरून नष्ट होण्याचा वेग वाढला आहे. काही वनस्पतींच्या प्रजाती पृथ्वीवरून नामशेष झाल्या आहेत. तसेच प्राणी प्रजाती नष्ट झाल्या असून प्रजाती सध्या धोकादायक स्थितीत आहेत. म्हणून त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन करणे. अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार यांनी केले. ते नंदगोपाल फाऊंडेशन व रोटरी क्लब भंडारा व महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या वर्षा चांदेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार, रोटरी क्लब भंडाराचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक चुटे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, प्रा. गणेश किरसान, प्रा. विनोद चव्हाण तसेच महिला अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येचे आराध्य दैवत सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जागतिक पातळीवर विदेशात काय चांगले आहे. आणि त्या मानाने भारताची काय स्थिती आहे. यातील फरक सांगत भु -मातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विधायक कार्य स्वत:पासून सुरू करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक चुटे यांनी केले.अनेक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाते. या वृक्षांची वाढ सुकर व्हावी तसेच त्यांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक पातळीवर हातभार लावणे ही प्रत्येकांसाठी अभिमानाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहून तळमळीने वृक्षसंवर्धनाचे कार्य करणे आवश्यक आहे. कारण हे कार्य खरोखर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ज्याठिकाणी झाडे आहेत त्याठिकाणचे तापमान कमी असते. प्रत्येकांनी आपल्या वाढदिवस किंवा चांगल्या कामानिमित्त वृक्षारोपण बरोबरच त्याचे संवर्धन सुध्दा करावे. असे मार्गदर्शन महिला अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या वर्षा चांदेकर यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा काळे व प्रास्ताविक प्रा. विनोद चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार काजल बुजाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नंदगोपाल फाऊंडेशनचे मनोज लांजेवार, सर्विन भोयर, भावेश बावनकुळे, रूपाली राघोर्ते, सिमा पवनकर, साक्षी मेश्राम, सानिया मस्के, अस्मिता हुकरे, रिना सेलोकर, स्नेहा शेंडे, पायल एंचिलवार, ममता उताणे, आरती घोनमोडे, प्राची ढोमणे, आकांक्षा भुरे, आचल शेंडे, मोटघरे, सोनाली लांजेवार, ईशा शेंडे, डिंपल मांदाळे, सायली मस्के, वैष्णवी गिदमारे, प्रिया सेलोकर, रविना कांबळे, काजल बुजाडे, पल्लवी गभणे, शेंडे, अर्चना नेवारे, श्रृती डहाके, साक्षी धांडे, कविता चव्हाण, करिष्मा चोले, सानिका इंदुलकर व महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिक्षकेत्तर कर्मचारी, छात्रध्यापक विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here