सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
8459702192
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात महिला स्वयसहायता समूह अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले त्यात प्रामुख्याने आरोग्य, एच बी कॅम्प, बँक कर्ज लोन मेळावा, असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून महिलाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते, कुटुंबाचे दारिद्र्य दूर करून सन्मानाचे जीवन जगावे यासाठी महिलाना कर्ज उपलब्ध करून त्यांना लघुउद्योग उभारण्यासाठी मदत केली जाते, एवढेच नाही तर महिला सक्षमीकरनासाठी विविध पदावर महिला कार्य करता त्यातून त्यांना रोजगार ही मिळतो व महिला सक्षमीकरनाचे कार्य ही होते, ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल यातून थोड बाहेर पडून स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करावे व सक्षम व्हावे, एक स्वावलंबनाचे जीवन जगावे यासाठी कायम प्रयत्न शील असणारे हे अभियान,
सदर कार्य पार पाडताना, तालुका अभियान व्यवस्थापक, मनोज साळी, प्रभाग समन्वयक विलास वाळके, रेणुका सोनवणे व तालुक्यातील सर्व कॅडर यांचे मोलाचे सहकार्य आहे.

