पेसा समिती व ग्रामवासियांची अजय कंकडालवार यांच्याकडे तक्रार…!
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : मेडपल्ली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मडावी यांचेविरुद्ध तलवाडा पेसा समिती व गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून योग्य कारवाईची मागणी केली आहे.सदरहू तक्रारीची प्रत त्यांनी योग्य कारवाईस्तव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी आणि जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना ही दिली आहे.
संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत मागील एक वर्षांपासून पेसा समितीची बैठक बोलाविली नाही.घरकुलसाठी ठराव मागायला गेले तर उद्धट वागणूक करतात.नेहमी गैरहजर असतात,पेसा समितीचे सदस्यांना व ग्राम पंचायत सदस्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देत कोणासोबत ही अरेरावी भाषा वापरत असतात.असे अनेक आरोप ग्रामसेवक मडावी यांच्या विरुद्ध केले आहे.
मेडपल्लीचे ग्रामसेवक मडावी यांच्यावर योग्य कारवाई करून तात्काळ बदली करून नवीन ग्रामसेवकाला नियुक्ती देण्याची मागणी पेसा समितीने तक्रारीतून केली आहे.तलवाडा येथील पेसा समितीचे सदस्यांनी आणि ग्राम वासियांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन.
त्यांना ग्रामसेवक विरुद्धची तक्रारीची प्रत सादर करून ग्रामसेवकाविरुद्ध उचित कारवाई साठी संबंधित अधिकाऱ्यांकडे योग्य पाठपुरावा करण्याची विनंती केली.यावेळी अजय कंकडालवार यांनी योग्य सहकार्याचे करण्याचे आश्वासन देत पेसा समिती अन गावाकऱ्यांकडून तेथील समस्या जाणून घेतले.

