निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दर वर्षी प्रमाणे डोंगरगाव (हा) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमाना बाळू बिराजदार, उपसरपंच कांताबाई . बिराजदार , अब्बा श्रिनामे, शिवाजी हजारे, बबन पवार, बाळासाहेब बिराजदार आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना करत सार्वजनिक पंचशील त्रिश्रण ग्रहण करण्यात आले. यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय परमेश्वर भालेराव सचिव प्रवीण उर्फ पिंटू उघाडे .भालेराव बंधू एकता कमिटीची सर्व पदाधिकारी.तसेच गावातील आजी ,माजी , सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील विलास श्रीनामे ,व जयंती मंडळाला दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी कासार शिर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी, व कर्मचारी हे ही हजर राहून आम्हला विशेष असे सहकार्य केले. या वेळी गावातील महिला सुवर्णा बिराजदार यांचा गावातील पहिली ट्रॅक्टर चालक महिला म्हणून यांचा स्मुर्ती चिन्ह शाल श्रीफळ देऊन पोलीस पाटील विलास श्रीनामे इंद्रजित भालेराव याचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कांचन उगाडे यांची डोंगरगाव येथे अंगणवाडी सेविका महणून निवड झाले बद्दल जयंती मंडळाच्या वतीने उपसरपंच कांताबाई बिराजदार,कांचन उघाडे.प्रवीण उघाडे अलका भालेराव केशव भालेराव, आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी ,देऊन दोन्ही महिलांचा यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . जयंती मिरवणूक यशस्वीतेसाठी पी एस भालेराव, केशव भालेराव, मोहन भालेराव, विश्वनाथ भालेराव, राजु भालेराव ,माधव भालेराव, त्रिमुख भालेराव, बालाजी भालेराव, पांडुरंग भालेराव, वामन भालेराव, मुकुंद भालेराव, अतिश सूर्यवंशी, लक्ष्मण गायकवाड, दत्तां सूर्यवंशी, विश्वदीप भालेराव, तेजस भालेराव, विकास भालेराव, आकाश भालेराव, गौतम भालेराव , शिद्देश्र्वर भालेराव विशाल भालेराव, उत्तम भालेराव .दिलीप भालेराव,जयदीप हजारे ,शिवाजी गोरे ,सुमन भालेराव, शोभा सूर्यवंशी शहाराबई भालेराव, लक्ष्मी भालेराव,पंचशिला भालेराव, प्रभावती भालेराव, अलका भालेराव, बेगडाबाई भालेराव, मीना भालेराव, चांदणी भालेराव, शांताबाई भालेराव, कडाबाई भालेराव, राजु भालेराव शमू लोकरे, मुक्ता उघाडे, महादेवी भालेराव, सुनीता भालेराव, अदी महिला पुरुष व गावातील सन्माननीय पदाधिकारी यांनी डॉ बाबासहेब आंबेडकर जयंती मिरवणूक यशस्वीतेसाठी सहकार्य केले बदल सर्वाचे मंडळाच्यावती आभार मानले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन हे इंद्रजित भालेराव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत विशेष असे नागरिकाचे लक्ष वेधून घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, तथागत महात्मा गौतम बुद्ध यांची प्रतिमा मिरवणुकीत असल्याने मिरवणूक शोभून दिसत होती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणा देत सर्व डोंगरगाव हे निळे मय झाले होते यातच एकुर्गा येथील सम्राट अशोक लेझिम पथक यांनी ही मिरवणुकीत लेझिम खेळत नागरिकाचे मने जिंकली व मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर भोजन दान करून संध्यकाळी हलशी हातरगा येथील गायन पार्टी भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

