नवनियुक्त भाजप तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांची मागणी.
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यंदा वैनगंगा म्हणजेच प्राणहीता नदीच्या पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे. एप्रिल महीण्यातच प्राणहीता नदी कोरडी होतांना दिसत आहे. अहेरी ऊपविभागात प्राणहीता नदीचे पाणी जिवन प्राधिकरण तथा ग्रामिण पाणी पुरवठा योजने मार्फत गावागावात पोहोचवले जाते.
अहेरी उपविभागात सिंचन प्रकल्पच नसल्याने शेतींना पाणी पुरवण्याचा प्रश्नच नाही परंतू प्राणहीता नदीला पाणीच नसल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजण्याची दाट शक्यता आहे.गोसेखुर्द प्रकल्पासह चिचडोह प्रकल्पाद्वारे पावसाळ्यात मोठा पाऊस पडत पावेतो प्राणहीता नदीपात्रात वाहते पाणी असावे आणि किमान पिण्याचे पाणी अखंड मिळावे यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. नुकतेच गोसेखुर्दचे पाणी सोडण्यात आले होते परंतू त्यातून प्राणहीता नदीत चिचडोह प्रकल्पाने सोडले नाही त्यामुळे गोसेखुर्दने पाणी सोडल्याचा फायदा प्राणहीता नदीला झाला नाही. मागिल दोन-तिन वर्षात नियोजनशुण्यतेमुळे पाऊस नसतांनाही अहेरी ऊपविभागात गोसेखुर्द प्रकल्पामुळे कृत्रीम महापुर आला होता. आता अहेरी ऊपविभागात पाण्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावे अशी मागणी भाजपचे नवनियुक्त अहेरी तालूकाध्यक्ष विकास तोडसाम यांनी प्रशासनाकडे केली आहे.!
यावेळी संतोष माद्दीवार,रमेश समुद्रालवार,विनोद जिल्लेवार, राकेश कोसरे, अक्षय संतोषवार, सिद्देश सिडाम, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते!

