प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पस सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे दर वर्षीप्रमाणे निलेश शेंडे, प्रशांत शिंदे व गुरु भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मागील सतरा वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी सुद्धा 24 एप्रिल ला सकाळी 10 वाजता शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिर चे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक युवकांनी रक्तदान केले. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. प्रदीप अडकीने उपस्थित होते. शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे अधिकारी राकेश शेंडे, ड्रीम चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे तसेच गुरु भगत, कुंदन देवाळकर यांची उपस्थिती होती.

