prabodhini news logo
Home चंद्रपूर बाबुपेठ सिद्धार्थ नगरमध्ये अपूर्ण रस्ते व नालीच्या कामाला स्थानिकांचा विरोध

बाबुपेठ सिद्धार्थ नगरमध्ये अपूर्ण रस्ते व नालीच्या कामाला स्थानिकांचा विरोध

0
1468

मनपाचे अधिकारी देतात तात्काळ काम पूर्ण करण्याचे आश्वासन

प्रशांत रामटेके संपादक/ तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : बाबुपेठ येथील सिद्धार्थ नगर परिसरात रस्ता व नालीच्या अपूर्ण व चुकीच्या कामावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही निवडक घरांना वगळून सुरू असलेल्या या कामामुळे अन्य नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

या संदर्भात आज स्थानिक रहिवाशांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांच्या चुकीकडे लक्ष वेधले. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, मनपाच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली व अर्धवट राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यावेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, स्नेहल नगराळे, बादल शेरके, निखिल उमरे, यश उमरे यांच्यासह इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिकांच्या या एकजुटीने प्रशासनाला जागे केले असून लवकरच संपूर्ण परिसरातील रस्ते व नालीच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here