prabodhini news logo
Home ठळक बातम्या नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदी, शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे आप ची मागणी

नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदी, शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे आप ची मागणी

0
192

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – काश्मीर मधील पहेलगाम येथे दहशतवादी भ्याड हल्यात भारतीय नागरिकांचा एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला यात पुण्यातील कै. जगदाळे, गणबोटे यांचा मृत्यू झाला असून हा हल्ला धर्मविचारून केल्याचे समजते जर अतिरेकी धर्म विचारून गोळ्या घालत असतील तर ही अतिरेक्यांमध्ये बदलती मानसिकता केंद्र सरकारने तपासले पाहिजे ज्या पद्धतीमध्ये भारताचे राजकारण विकासावरती न चालता जाती वरती चाललेले आहे. त्याचा हा परिणाम दिसून येते मोदी सरकार घाणेरड्या पद्धतीमध्ये राजकारण करत आहे.
त्यामध्ये भारतीय नागरिककांचा निष्पाप बळी गेल्याच्या दिसून येते.
ज्या ज्या वेळेस निवडणुकांना सामोरे जायचं असतं. त्यावेळेस पुलवामा सारखे हल्ले होतात कसे, खरंतर असा प्रश्न पडतो. अतिरेकी पाकिस्तान मधून भारतामध्ये येतात भारतीय वेशांतर करतात. बेछूट गोळीबार करून पुन्हा पाकिस्तान मध्ये जातात. यामध्ये आपले इंटेलिएंट काय करत होती. भारतीय सैनिक तिथे का नव्हते असाही त्या ठिकाणी प्रश्न पडतो. काश्मीर मधून येणाऱ्या पर्यटकांना विमान तिकीट प्रवास सुद्धा चार पटीने महा करण्यात आला. मेल्यावरच लोणी टाळू खाणार हे सरकार असून नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंगयांनी, उडान मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. असा आरोप आम आदमी पार्टी पुणे प्रशांत कांबळे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here