नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज धामोरी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०८ व्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . या पुण्यतिथी उत्साह निमित्ताने सकाळी ८ ते १० या वेळेत भव्य दिव्य पालखी प्रतिमा मिरवणूक सोहळ्याचे फटाक्यांचा आतिशबाजी करत आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरापासुन धामोरी बस स्टॅंड परिसर ,श्री संत सावता महाराज मंदिर,श्री भैरवनाथ महाराज मंदिर,श्रीराम मंदिर,श्री खंडेराव महाराज मंदिर अशा विविध भागातून भव्य दिव्य अशी पालखी मिरवणुक काढण्यात आली होती.
तसेच या कार्यक्रम आयोजन प्रसंगी १० ते १२/३० या वेळेत वाणीभुषण हरिभक्त परायण चेतनजी महाराज बोरसे (मालेगावकर) यांचे सुश्राव्य असे कीर्तन सोहळ्याचे ही आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.या वेळी धामोरी व परिसरातील समाज बांधवानींही मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत दर्शविली होती.या कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळ व धामोरी ग्रामस्थ व भजनी मंडळाचे मोठा सहकार्य लाभले.

