prabodhini news logo
Home कोपरगाव नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग पुणतांबा चौफुली ते गोदावरी नदी पुलाबाबत चौकशी करून...

नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग पुणतांबा चौफुली ते गोदावरी नदी पुलाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

0
333

अन्यथा आत्मदहन करणार – शिवाजी कवडे पाटील

नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677

बळीराजा पार्टी विधानसभा अध्यक्ष यांचा इशारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी या रोडचे कामकाज अगदी शांत गतीने सुरू असुन वेळोवेळी आमरण उपोषण करून सुद्धा काही एक काम पुर्ण होत नसल्याने मतदारसंघात हुकुमशाही चालू असुन या बाबतीत काही एक विकास दिसून येत नाही मतदारसंघ हा स्वतः ची जहागिरी असल्याचे दिसून येत आहे नुसता मुक्याला बुक्यांचा मार दिला जात असुन त्यात लोकप्रतिनिधी फक्त स्वतः ला विकास पुरूष समजत असुन कोणताही विकास आणी उत्कृष्ट पणाच कामकाज नसुन फक्त उल्लु बनविण्याचे कामकाज पाच वर्ष समाजाला पाहयला मिळतं आहे
पुणतांबा चौफुली, बेट नाका येथे मोठमोठे बोगदा बांधुन ठेवले असुन त्याची काहीएक गरज नसताना जास्तीत जास्त प्रमाणात अपघात व्हावं समाजाचं नुकसान व्हावे हिच मनी धारणा लोकप्रतिनिधीत्व मधुन दिसुन येत आहे अनेक आंदोलने, उपोषण करून भ्रष्टाचाराची व नित्कृष्ट कामाची कारवाई करावी दोषींवर कारवाई करावी म्हणून अनेक निवेदने दिली परंतु राजकीय दहशती मुळे कोणतीही कारवाई किंवा अपेक्षित उत्तर मिळाले नाही हा सरासरी अन्याय होत असुन मुद्दाम वेठीस धरून समाजाला तळतळाट देण्याचं कामकाज या मतदारसंघात राजकीय लोकांकडून होत असुन कोट्यावधी रुपयांची बोर्ड लावला जातो उद्घाटन केले जाते परंतु कोट्यवधी रुपयांची कामे फक्त लाखात नित्कृष्ट दर्जाचे दिसुन येत आहे या बाबतीत ठेकेदार यांच्यावर कोणतीही चौकशी अथवा कारवाई झाली आहे याला अपवाद राजकीय लोकप्रतिनिधी असुन कोणतही समाज उत्तर दायीत्व पार पडताना दिसत नसुन आपत्तीचा सामना नागरीकांना करावा लागत आहे
आता पुरे झाले आमरण उपोषण केले, निवेदने दिली पुणतांबा चौफुली बेट नाका येथील बोगद्यातून या पुढे किती अपघात होतील हे सांगता येणार नाही व राष्ट्रीय महामार्ग अभियंता व सल्लागार समिती हे तर उडवा उडवीचे उत्तर देताना दिसत आहेत ते सांगतात कि लोकप्रतिनिधी जे आदेश देतात त्यांचे पालन आम्हाला तंतोतंत करावे लागते आमचा नाईलाज आहे
म्हणून गोदावरी नदी पुलाबाबत व पुणतांबा चौफुली बेट नाका येथील बोगदा बाबत तसेच रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरीकांना अपघाताचा सामना करावा लागतो कोणतेही कारवाई ठेकेदार व झालेला भष्टाचार बाबत चौकशी होत नसुन म्हणून आपण स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय घेत आहे
हि बातमी पञकार प्रसिद्ध साठी दिली आहे कारण न्याय मिळत नाही अन्याय सहन होत नाही मतदारसंघ केवळ राजकीय जहागिरी असल्याचे दिसून येत आहे म्हणून आम्ही स्वतः आत्मदहन करण्याचा विचार घेत असुन याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे याची चौकशी होण गरजेच आहे
शिवाजी पोपटराव कवडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here