
सर्वांना आग्रहाचे अगत्यपूर्वक निमंत्रण..!
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – परमपूज्य बोधिस्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अनु.जाती विभागाच्यावतीने युगप्रवर्तक महोत्सव-2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महामानव डॉ.बाबासाहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला संगीतमय अभिवादन करण्यासाठी ‘भीमगीत संगीत रजनी’चा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे जेष्ठ नेत्या, लोकप्रिय माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होईल. विशेष अतिथी म्हणून मा. शहाजी उमाप (नांदेड पोलीस परिक्षेत्र उपमहानिरीक्षक) तर प्रमुख उपस्थिती मध्ये खासदार मा.संजय (बंडु) जाधव, आमदार मा.राहूल पाटील आमदार मा.राजेश विटेकर, मा.रघुनाथ गावडे (जिल्हाधिकारी, परभणी) मा. रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधिक्षक, परभणी) मा.सुरेश देशमुख (माजी आमदार, परभणी विधानसभा, मा. धैर्यशील जाधव (आयुक्त म.न.पा.परभणी) मा.भगवान वाघमारे (मा. उप महापौर, म.न.पा. परभणी) मा.खासदार तुकाराम रेंगे पाटील व जेष्ठ विधिज्ञ मा.अशोक सोनी आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अभिवादन सोहळया प्रसंगी आदरणीय भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व भिक्खू संघाची धम्मदेसना होणार आहे.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे व मिलिंद शिंदे शिंदे यांच्या बहरदार प्रबोधनपर भीमगीत संगीत रजनी होणार आहे. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते १४ एप्रिल २०२५ च्या मिरवणूकीतील उत्कृष्ट देखाव्यांसाठीचे पारितोषिक वितरण देखील होईल. अभिवादन महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सोहळयाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. रविवार, दि.३० एप्रिल २०२५, वेळ : सायं.६.०० वा. विष्णू जिनींग ग्राऊंड अक्षदा मंगल कार्यालय समोर, वसमत रोड, परभणी येथे संपन्न होत असलेल्या या शानदार भीमगीत संगीत रजनीस आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सर्वांना आग्रहपूर्वक निमंत्रण..!














