शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली,भारतिय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाऊण्डेशनच्या वतीने आयोजीत दिव्यांग जन आणि ज्येष्ठ व्यक्तिच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टिने, कारंजा बायपास वरील,स्थानिक तालुका व शहर शिवसेना (उभाठा) यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथ मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांगाच्या पुनर्तपासणी व नोंदणी शिबीरासाठी, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजीत करण्यात आला होता.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खा.संजयभाऊ देशमुख यांनी केले यावेळी मंचकावर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ तुरक,युवतीसेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन, कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरडकर,शहर प्रमुख गणेश बाबरे, विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिचकार ,खासदारांचे पि.ए. ओंकार काकडे महाराष्ट्र अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे,अपंग संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्षा कु चित्रा वाकडे, कार्याध्यक्ष ब्रम्हदेव बांडे, काळी खेर्डा माजी सरपंच प्रदिप वानखडे उपस्थित होते.सर्वप्रथम खासदार देशमुख यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठांशी संवाद साधून, फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले. त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी दत्ताभाऊ तुरक, विलासराव सुरळकर, गणेश बाबरे, शंभूराजे जिचकार, प्रियाताई महाजन यांनी शाल श्रीफळ देवून खासदार देशमुख यांचा सत्कार केला.त्यानंतर माजी सरपंच प्रदिप वानखडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे, कार्याध्यक्ष ब्रम्हदेव बांडे, धनराज जाधव, प्रमोद ठाकरे, चित्रा वाकडे, सुचित्रा हटकर, रेणुका जाधव, गुलाबराव राठोड, कांताबाई लोखंडे, लोमेश चौधरी, रोशना रेघीवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.उद्घाटनप्रसंगी बोलतांना खासदार संजय देशमुख म्हणाले, “मी दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देवून प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास कटीबद्ध आहे.दिव्यांगाना कोणतीही अडचण असल्यास मला कळवा” असे त्यांनी आवर्जून सांगीतले.
यावेळी शेकडो दिव्यांग बांधवानी नाव नोंदणी करून कागदपत्र सादर केली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलासराव सुरडकर,आभार ब्रम्हदेव बांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ओंकार काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी युडीआयडी कार्ड धारक नविन ३७० लाभार्थी पात्र ठरल्याचे कळविण्यात आले. आयोजकांकडून कार्यक्रमाला आलेल्या दिव्यांगाची बसण्याची, भोजनाची व थंड पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती असे वृत्त मिळाले आहे.

