prabodhini news logo
Home चंद्रपूर ग्रामजयंतीनिमिताने ऊर्जानगर वसाहतीतून काढण्यात आली रामधून

ग्रामजयंतीनिमिताने ऊर्जानगर वसाहतीतून काढण्यात आली रामधून

0
102

स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – चंद्रपूर:गावाच्या परीवर्तनानेच देशाचा विकास होईल यासाठी गावात सामुदायिक ध्यान, प्रार्थना व रामधुन मिरवणूक हे उपक्रम सतत राबविणे गरजेचे आहे. गावाचे कल्याण साधण्यासाठी सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांनी सांगितली आहे. यातून विश्व कुटुंबाची संकल्पना साकार होईल असे महाराजांनी सांगितले आहे.

वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती म्हणजेच ग्रामजयंती दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने जीवन शिक्षण व बाल संस्कार शिबीर सुरू आहे त्या शिबिरार्थी व गुरुदेव सेवक सेविकाच्या वतीने ऊर्जानगर वसाहतीतून पहाटे सामुदायिक ध्यानानंतर रामधून काढण्यात आली.या रामधूनमध्ये राष्ट्रसंताची भजने गायण्यात आली चौकाचौकात जयघोष घेण्यात आला.या रामधूनच्या महत्वावर मा.सुबोधदादा संचालक भूवैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी ब्रम्हपुरी यांनी मार्गदर्शन करून त्याचे महत्व पटवून दिले.यावेळी जीवन शिक्षण व बाल संस्कार शिबीराचे मार्गदर्शिका सुश्री रेखाताई बुराडे, सर्व प्रशिक्षक, शिबिरार्थी व गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक सेविका यांची उपस्थिती होती.शेवटी जयघोष घेऊन रामधूनची सांगता करण्यात आली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here