सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
8459702192
नाशिक शहरातील पाथर्डी फाटा विहिनगाव रोड, नाशिक येथे बाळकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या कार्यालयाचा शुभारंभ अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11 वाजता मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात आला, तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा , विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन नवतरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम तसेच क्रीडा महोत्सव, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचे कार्य ही ही बहुउद्देशीय संस्था करणार आहे,त्याचप्रकारे अनेक गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यावर भर देण्याचे कार्य ही ही बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करेल, असे या संस्थेचे निर्माते कैलास चौधरी यांनी सांगितले.

