सिडीसीसी बँकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीयाचे आरक्षण डावलून कोट्यावधीचा भ्रष्टाचार.

0
31

सिडीसीसी बैंक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लागलेल्या उमेदवारांची यादी जाहीर,

या भरतीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आई वडील व नातेवाईकांचे बैंक खाते तपासण्याची मागणी.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत जी मुलं मुली भरती करण्यात आले त्यांनी बैंक अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक व बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांना 25 ते 40 लाख रुपये देऊन भरती घेण्यात आली असल्याचा आरोप करून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैंकेच्या कर्मचाऱ्यांची मुलं मुली व नातेवाईक कसे पैसे घेऊन लावले गेले त्याची यादीच पत्रकांरासमोर ठेऊन ज्या कर्मचाऱ्यांची भरती झाली त्यांचे व त्यांच्या आई वडीलासह नातेवाईकांचे बैंक खात्याची चौकशी करावी अशी मागणी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती चौकशी समितीच्या अध्यक्षाकडे व एसीबी कडे करू असा इशारा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहें.

सिडीसीसी बैंकेच्या 360 पदांच्या नोकर भरतीत सगळे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाघेवाण केली व मागासवर्गीयांचे आरक्षण संपवून नोकर भरती जानेवारी 2025 ला घेण्यात आली होती, दरम्यान आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने नोकर भरती विरोधात तब्बल 28 दिवस आंदोलन केल्यानंतर माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती च्या आंदोलनकर्त्यांना नोकर भरतीच्या चौकशी चे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या पुढाकारने आमरण उपोषकर्ते मनोज पोतराजे व रमेश काळाबांधे यांनी आमरण उपोषण सोडले होते, काही दिवसातच विभागीय सहनिबंधक वानखेडे यांच्या आदेशाने नोकर भरतीची चौकशी समिती नेमून बैंकेच्या सर्व दास्तावेज तपासल्या जातं आहें व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी चौकशी समिती पुढे आपली पुरावयासह माहिती देणारं आहें, या पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव संघर्ष समिती चे समन्वयक राजू कुकडे, सूर्या अडबाले, संजय कन्नावार, मनोज पोतराजे, अनुप यादव, नभा वाघमारे,महेंद्र खंडाळे, दिनेश एकवनाकर इत्यादीची उपस्थिती होती.

कोण आहेत नवनियुक्त कर्मचारी ज्यांचे वडील बैंक व इतर कार्यालयात कर्मचारी आहेत?

बैंकेत पैसे देऊन भरती झाल्याचा मामला आता उजागार झाला असून सिडीसीसी बैंकेचे कर्मचारी व इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची मुलं पैसे देऊन व शिफारीश लागल्याचा हा पुरावा असल्याचा आरोप राजू कुकडे यांनी केला आहें. यामध्ये सारंग जयकृष्ण तिजारे, प्रतीक रामभान बोधले, कु. मोहिनी मुकुंदा कुबे, स्वप्नील दिलीप येरोजवार,कु. पुजा विजय बावणे, मो. राउफ मो. शरीफ शेख, कुणाल सुनील रघाताटे, लोकेश राजेश डॉगरवार, गोपाल विलास सातपुते. स्वप्नील रमेश अडवाले, यशवंत राजेशसिंग चौहान, सौ. काजल वैभव दिवे,अमोल शेरकी, कु. स्नेहल रवींद्र टाजणे, राहुल श्याम गरडे. कु. शिल्पा नत्धुजी बेलेकर, कु. रूपाली सुधाकर पोडे, मनीष प्रभू सूर्यवंशी, प्रणय दत्तात्रय वाढई,
कु. दीक्षा मरोहर चन्ने. अंकित विठ्ठल जोगी, तुषार सत्यपाल मस्की, ओमकार संजय शास्त्रकार, कु आकांक्षा नरेंद्र वाजणे. स्वप्नील केशवराव बाजगामे, तन्मय विजय बोरीकर. विशाल विजय खंगार, धनंजय ताराचंद निखाडे, आनंद अशोक पवार, मयूर रवींद्र संभाणी, ताराचंड धनंजय, निखाडे,स्वप्नील केशव दाजगावे इत्यादीची नावे असून यांच्या वडिलांचे व नातेवाईकांचे बैंक खाते तपासले गेले तर खरे आरोपी समोर येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here