prabodhini news logo
Home घुग्घुस राजीव रतन उड्डाणपूल निर्माण करणाऱ्या आर. के. मदानी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा...

राजीव रतन उड्डाणपूल निर्माण करणाऱ्या आर. के. मदानी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0
224

काँग्रेसची पोलीस अधीक्षकांना निवेदनातून मागणी

गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौक येथील रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहीका अडकल्याने रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दिनांक 05 मे 2025 रोजी सायंकाळी 7;30 ते रात्री 08 च्या दरम्यान घडली आहे.
वणी मारेगाव ग्रामीण परिसरातील रुग्ण उपचाराकरीता चंद्रपूर येथे जात असतांना घुग्घुस राजीव रतन चौकातील रेल्वेगेट जवळ वाहतुकात अडकून त्याचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला गेल्या तीन वर्षात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे व अनेक नागरिक अपघाताला बळी पडलेले आहे. याला सर्वस्वी आर. के. मदानी या कंपनीचा बेजवाबदारपणा व भोंगळपणा कारणीभूत असल्याने आर. के. मदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी तसेच ऍड. निलेश हरणे यांच्या वतीने पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का यांना केली आहे.

रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे – नागरिकांची मागणी


चंद्रपूर ते यवतमाळ मार्गांवरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेटवर आर. के. मदानी कंपनीतर्फे उड्डाणपुल निर्माण करण्यात येत आहे.
मात्र याठिकाणी निर्माणाच्या नावावर केवळ थट्टाच शुरु आहे कंपनीला पूल निर्माण करण्याची दिलेली निर्धारित मुद्दत संपून वर्ष लोटला असतांना देखील उडान पूलाचा काम झाला नाही आता तर कामच बंद असल्याने नागरिकांची जीवे जात आहे. आर. के. मदानी कंपनी तर्फे रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून कासव गतीने शुरु असून याठिकाणी एकेरी रस्ता असल्यामुळे व हा रस्ता कंपनीने आपल्या निर्माण कार्यामुळे खराब केल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे व खडतर रस्ता केल्यामुळे सतत अपघात होतात हा रस्ता कंपनी तर्फे ग्रेडर मशीन द्वारे तातडीने दुरुस्त झाला पाहिजे हा रेल्वेगेट दर अर्ध्या तासात बंद होत असल्यामुळे वाहतूकाची प्रचंड कोंडी निर्माण होत असते. या मार्गांवरून जडवाहतुकीला बंदी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून याठिकाणा वरून सध्या जाडवाहतूक शुरु झाल्याने याठिकाणी प्रचंड अशी वाहतूकाची कोंडी निर्माण झाली यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना व विशेषतः राजीव रतन रुग्णालयात येणारे जाणारे रुग्ण तसेच वेकोली कॉलनी व वणी क्षेत्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना वाहतूक कोंडीमुळे जीवघेणा त्रास भोगावा लागतो व कधी कधी जीवाला ही मुकावा लागते कृपया या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी व
जाडवाहनाना या मार्गाने येण्या जाण्यासाठी रात्री ते पहाटेची वेळ उपलब्ध करून द्यावे व वाहतुकीची कोंडी सोडवावी तसेच आर. के. मदानी कंपनीने तातळीने पुलाचे निर्माणकार्य पूर्ण करावे तसेच रस्त्यावरील खड्डे भरून काढावे अन्यथा या कंपनी विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,तालुका सचिव विशाल मादर, जिल्हा महासचिव अलीम शेख, बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर, सुनील पाटील, शहंशाह शेख,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here