गणेश शेंडे शहर घुग्घुस शहर प्रतिनिधी – आज दिनांक. 4/5/2025, ला घूगूस येथील नव्याने सुरू झालेल्या आई फाउंडेशन संस्था घूगूस तर्फे हेमलकसा येथिल डॉ. प्रकाश जी आमटे समाजसेवक यांची सर्व टीमने भेट घेतली व त्यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदन मध्ये आम्ही असे नमूद केले की आपल्या समाजसेवा कार्याला प्रेरित होऊन आम्ही सुद्धा आई फौंडेशन नावाची संस्था काढली व या संस्थेच्या मार्फत दिन दलित गोरगरीब शेतकरी शेतमजूर वॉटर पकड जातीच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार व त्यांच्यासाठी नेहमी मग शाल श्रीफळ देऊन सत्कार असो की वृक्षारोपणासाठी लहान पिल्यांसाठी चिमण्यांसाठी घरटे असो की समाजामध्ये वावरत असताना घाण कचरा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी साडीचोळी देऊन सत्कार असो अशा पद्धतीचा कार्यक्रम आमच्या संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे याची माहिती आम्ही डॉक्टर प्रकाश जी आमटे सरांना दिली त्यांनी सुद्धा या संस्थेच्या कार्याची व सर्व पदाधिकाऱ्यांची स्थिती केली कौतुक केलं व असेच कार्य आपल्या संस्थेतर्फे नेहमी सुरू राहावे याकरिता आम्हाला आमच्या संस्थेला सुभा आशीर्वाद दिला व आम्ही त्यांच्याकडून एक समर्थन पत्र सुद्धा घेण्यात आले.
याप्रसंगी पत्र देत असताना संस्थेचे अध्यक्ष अमोल नथुजी मांढरे, उपाध्यक्ष इरफान शेख, सचिव जिग्नेशवर दिघोरे, सहसचिव राजेंद्र दाभेकर, कोषाध्यक्ष भूषण झुर्मुरे व समस्त पदाधिकारी उपस्थित.

