सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील धोडप किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना जयंती पुरते मर्द्यादित न ठेवता मागील 6 वर्षांपासून किल्ले धोडप वर श्री रौद्रशंभु प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवत आहेत जसे कि ऐतिहाशिक शिवजयंती जी महाराष्टतील सर्वात उंचावर साजरी केली जाणारी शिवजयंती आहे. तसेच वर्षभर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण मोहीम आणि दुर्गसंवर्धन मोहीम सुरु असतात. तसेच दिनांक 4 मे रविवार रोजी झालेल्या मोहिमेत किल्ल्यावरील ऐतिहाशिक पाण्याचे टाके साफ करण्यात आले. जवळपास 3 ट्रॅक्टर इतके दगड आणि गाळ काढून टाक्यानी मोकळा श्वास घेतला. सध्या अजून पण काही काम टाके साफ करायचे काम चालू असल्याने पुढील रविवारी होणाऱ्या मोहिमांना जास्तीत जास्त युवकांनी उपस्तिथ राहून सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

