
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावी राहणारे खंडेराव वामनराव शिंदे (अण्णा बाबा ) यांनी आपल्या सहस्त्र जीवनातील चंद्रग्रहण पूर्ण केलेले आहेत या निमित्ताने अण्णा बाबांचा 94 वा वाढदिवस शिंदे परिवार नाती नातवंड यांच्याकडून श्रीराम मंगल कार्यालय मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खरंतर अण्णा बाबाचा इतिहास म्हटलं की 27 3 1931 साली अतिशय गरीब घराण्यात अण्णा बाबा चा जन्म निफाड येथे झाला.
त्या वेळेपासून अण्णा बाबाला कुठल्याही प्रकारचा पैशाचा मोह नव्हता 19 47 साली पाचवीला शाळा सोडल्यानंतर अण्णा बाबा ने शेतात खूप हलाखीचे चे काम केले त्यावेळेस शेतामध्ये काम करण्यासाठी सगळीकडे लाकडी अवजारे होती. 19 52 साली अण्णा बाबांचा चांदोरी तालुका निफाड येथील पंढरीनाथ गडाख यांचे कन्या हिराबाई गडाख यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यावेळेस लग्न वराड हे बैलगाडीने जात असे हा एक मोठा इतिहास आहे अण्णा बाबांचा. नंतर अण्णा बाबांना संतांचा सहवास लागला त्यातून त्यांनी पैठण वारी पाच आळंदी वारी पाच व दर आषाढी वारीला पंढरपूर व चारीधाम यात्रा केली. अतिशय प्रेमळ स्वभावाचे अण्णा बाबा त्यांना दोन भाऊ व पाच बहिणी आहेत व त्यांना दोन मुली व तीन मुले अशी अपत्य आहेत खरोखरच अण्णा बाबांचे संस्कार त्यांच्या मुलांना नातवंडांना व मुलींना चांगले प्रकारे लागले. असे व्यक्तिमत्व असलेले अण्णा बाबा यांच्या 94 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या वाढदिवसानिमित्ताने गावातील 80 वर्षाच्या आसपास असणारे ग्रामस्थ व मंडळी त्यांना शाल श्रीफळ व बक्षीस देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. अण्णा बाबांनी आपल्या जीवनातील सहस्त्रचंद्रदर्शन पूर्ण केले म्हणून गावातील ग्रामस्थ शिक्षक वृंद पतसंस्था संस्थापक चेअरमन यांच्या हातून अण्णा बाबांचा सत्कार करण्यात आला. या वाढदिवसा दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वरगंधर्व शंकरराव वैरागकर सर व यांची टीम यांनी भजनाचा कार्यक्रम करून आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन केले. अण्णा बाबांना त्यांच्या 94 व्या वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा देऊन नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला.















