
सुमारे 100 वर्षांपूर्वी परिचारिका या व्यवसायाला हीन दर्जाचे समजले जाई. परंतु 19 व्या शतकात फ्लोरेन्स या इटलीमधील देशात 12 मे 1820 रोजी जन्मलेल्या फ्लोरेन्स
नाइटिंगेलने परिचर्या व्यवसायात आमूलाग्र बदल घडवून आणला. अत्यंत सधन तसेच खानदानी कुटुंबात जन्मलेल्या फ्लोरेन्स हीला तिच्या वडिलांनी लॅटिन, ग्रीक, इतिहास, विज्ञान, गणित या विषयांचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. ती खाणपणासूनच संख्याशास्त्रात अतिशय हुशार होती. आकडेवारीचे आलेखांच्या सहाय्याने दृश्य सादरीकरण करणे, याला त्याकाळात फारसे महत्व नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला.
नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास ‘नाइटिंगेल रोझ प्लॉट’ असेही म्हटले जाते.इ.स. 1854 ते 1856 या काळात रशिया विरुद्ध तुर्कस्तान असे क्रिमियन युद्ध झाले. यात तुर्कांकडे जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी रिलिजिअस सिस्टर्स होत्या. इंग्लंडकडे मात्र प्रशिक्षित नर्स नव्हत्या, तर अप्रशिक्षित पुरुष होते. त्यामुळे जखमी सैनिकांची काळजी व्यवस्थितपणे घेता येत नव्हती.त्यामुळे इंग्लिश स्त्रियांना आवाहन करण्याची बातमी तेथील वर्तमानपत्र टाइम्समधून प्रसिद्ध करण्यात आले होती. त्यानुसार फ्लोरेन्स नाइटिंगेलने आपला मित्र सिडनी हर्बर्टला कळवले व लगेच पाच दिवसांनी तिला सरकारतर्फे नेमणुकीचे पत्र मिळाले व 38 अप्रशिक्षित नर्सना घेऊन ती युद्धक्षेत्रावर हजर झाली.तिच्याकडे सैनिकांच्या छावण्या देण्यात आल्या. त्या छावण्यांमध्ये जवळपास 1500 सैनिक रुग्ण होते.
स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी दुर्लक्षित असलेली आकडेवारी नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.
बालपणापासूनच स्वतंत्र विचार जोपासणाऱ्या फ्लोरेन्सल कोणतेही कार्य मनापासून करण्याची जिद्द होती. तिला परिचर्या या क्षेत्राविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. घरातून प्रचंड विरोधानंतर वयाच्या 33 व्या वर्षी तिला या क्षेत्रात काम करण्याची परवानगी मिळाली. अतिशय घाण, प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त वातावरणात जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शौचालयाची सोय नाही. रक्ताने माखलेले जखमी सैनिक जेथे कॉलरा व अन्य संसर्गजन्य रोगांची लागण झाली होती. त्या वेळी उपचार केलेल्या रुग्णांपैकी 42 टक्के रुग्ण सैनिक मृत्यू पावत.अशा वेळेस फ्लोरेन्स नाइटिंगेलने आपले कर्तृत्व पणास लावाली. परिणामी पूर्वी जो मृत्युदर 42 टक्के होता तो 2 टक्क्यांवर आला. दिवसभर रुग्णांची सेवा करन्यासाठी त्यांना वेळ परत नसे तेव्हा रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन सर्व सैनिक रुग्णांची चौकशी तसेच देखभाल करीत असे. नाईटिंगेल स्वतः रात्री वॉर्डमध्ये फिरत असे, रुग्णांना आधार देत असे; यामुळे तिला “लेडी विथ द लॅम्प” ही पदवी मिळाली. तिला सैनिकांचा आणि वैद्यकीय आस्थापनांचाही आदर मिळाला.या कार्यामुळे प्रभावित होऊन सर्व जण तिला आदराने प्रकाशदेवी (lady with lamp) असे म्हणत असत. काळजी प्रदान करण्याच्या आणि मृत्युदर सुमारे २ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या तिच्या कामगिरीमुळे प्रेस आणि सैनिकांच्या पत्रांद्वारे इंग्लंडमध्ये तिची कीर्ती झाली . (२० व्या शतकात इतिहासकारांनी केलेल्या तपासातून असे दिसून आले की बॅरॅक हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात मृत्यूचे प्रमाण नोंदवल्यापेक्षा खूपच जास्त होता.जो ब्रिटिश सरकारने लपवला होता.)
आजारी पडूनही विश्रांती न घेता वयाच्या 80 वर्षापर्यंत सतत ती कार्य करीत राहिली. 13 ऑगस्ट 1910 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी तिला झोपेतच मृत्यू आल. अशा या महान विभूतीस विनम्र अभिवादन.
डॉ. किरण पेठे, नागपूर















