मालवाडा घाटातून मोटरसायकल द्वारे जात असलेल्या इसमाचा वीज पडल्याने जागेवरच मृत्यू
शेतात बैल चारणाऱ्या साल गड्यावर वीज पडल्याने गंभीर जखमी
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – माहूर शहरासह तालुक्यात आज दुपारी तीन वाजता अचानकपणे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडल्याने मालवाडा घाटातून माहूर तालुक्यातील करंजी मोटरसायकल वर जाणाऱ्या संजय कृष्णकुमार पांडे वय 55 वर्ष यांचेवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत मौजे आसोली येथील शेतात बैल चालणारे अमरसिंग रामजी चव्हाण वय 55 वर्ष यांच्या बाजूला वीज पडल्याने ते भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना दि 15 रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे
माहूर शहरासह काही गावात दि 15 रोजी अवकाळी पावसासह वादळी वारे विजांच्या कडकडाटाने थैमान घातले होते यातच मौजे करंजी तालुका माहूर येथील संजय पांडे हे आपल्या बहिणीला उमरखेड येथे सोडून माहूर मार्ग मालवाडा घाटातून मोटरसायकल क्रमांक M H 29 B S 4681 ने परत करंजी जात होते अचानकपणे पाऊस सुरू होऊन वीज त्यांच्या अंगावरच पडल्याने ते त्यांचा जागेवरच मृत्यू होऊन ते खाली पडले यामध्ये त्यांचा दावा पाय मांडी आणि समोरील भागाच्या फासोळ्या सह तोंड भाजून नाकातून रक्त निघाले होते तर खिशातील मोबाईल जळाला तर दुसऱ्या घटनेत मौजे आसोली येथील माजी जि प उप सभापती समाधान जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेल्या अमरसिंग चव्हाण यांच्या बाजूला वीज पडल्याने ते गंभीर जखमी होऊन खाली पडले त्यांची पाठ आणि पाय गंभीर रित्या भाजले समाधान जाधव हे घरीच असल्याने त्यांनी गंभीर जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले मालवाडा घाटातील मृत्यूची घटना समजतात सपोनी शिवप्रकाश मुळे स पो उप नी संदीप आनेबोईनवाड यांचे सह पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळ गाठत मयत संजय पांडे यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले घटना कळल्याने तहसीलदार किशोर जाधव यांनी मंडळ अधिकारी तलाठ्यांना घटनास्थळावर तात्काळ पाठवून अहवाल शासनाकडे सादर केला मयत संजय पांडे हे मौजे हिवरा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक असून दिवाळीच्या सुट्ट्या निमित्त त्यांच्या आलेल्या बहिणीला उमरखेड येथे सोडण्यासाठी गेले परत येत असताना काळाचा घाला त्यांच्यावर पडला त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि परिवार आहे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक के बि वाघमारे वैद्यकीय अधिकारी बिपिन बाभळे यांनी शव विच्छेदन केले पंधरा मिनिट पडलेल्या पाऊस विजामुळे एकाचा मृत्यू झाल्याने करंजी सह माहूर तालुक्यावर शोक काळा पसरली आहे..

