
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगाव) येथे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविंद्रजी जनवार सचिव, गोंडवन विकास संस्था नागभीड यांच्या हस्ते करण्यात आला.इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८६.४८% तर बारावीचा निकाल ६२.७४ % इतका लागला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला एकूण ११३ पैकी १११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकूण ५१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे पहिली आलेली विद्यार्थिनी कु.अपूर्वा श्रावण शिवूरकर ( ८४.६० % )दुसरी जान्हवी शामराव जौंजाळकर ( ८४.४०% ),तिसरी कु.यशस्वी पुरुषोत्तम कुळे( ८३.४०%) , चौथी कु.समृद्धी दुष्यंत मेश्राम(८२.२०%) तसेच पाचवा कुणाल खेमराज ढोरे ( ८१.२०% )यांचा तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे पहिली आलेली कु.रिना श्रावण मेश्राम,( ६९.५० % )दुसरी मानसी हिराजी कुनघाडकर( ६७.५० % आणि तिसरी कु.ओमिना राजेंद्र धोडरे( ५७.५०% ) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मेश्राम,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
संचालन प्रा.नानाजी रामटेके तर आभार प्रमोद दिघोरे पर्यवेक्षक यांनी मानले.












