धामोरी येथे मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट व शोर शराबींचा कोहराम

0
35

पोलीस अधिकारी यांनी लक्ष द्यावे नागरिकांमधून चर्चेला उधाण

दत्तात्रय घुले धामोरी प्रतिनिधी – खेडोपाडी आता नागरीकरणाचा वेग वाढल्याने कुठलीही नवी बाब ही शहराबरोबरच किंबहुना अगोदरच गावांमध्ये लवकर अणुकरणशील ठरते.त्यात सोशलमिडियाचा वापर गावातील तरूणाईत मोठ्या प्रमाणात वाढल्याणे त्यात वेगळे काही दाखवण्यासाठी काहीही करायला तरूणतुर्क धजावतात.पण गंभीर बाब म्हणजे वयात येताणाच खेडोपाडी युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यातुन मद्यपान आणि नशेच्या धुंधीत काहीही करण्याची ऊर्मी युवकांमध्ये घातक ठरत आहे. लहान-लहान गावात मद्यपान केलेले युवक शैक्षणिक ठिकाणे, बाजारतळ, बसस्थानक, रिक्षा स्टॅंड किंवा गर्दिच्या ठिकाणी महिला, युवतींची छेड काढण्याचे प्रकार करीत असल्याने ही समस्या सामाजिक स्वरूप धारण करीत आहे.याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाहीतर या मद्यधुंद रोडरोमिओंचा व शोर शराबींचा कोहराम तरूणांचा सुळसुळाट अजुनच वाढत जाईल.
धामोरी हे गाव आकारमानाने व लोकसंख्येच्या मानाने जादा असल्याने तसेच सात ते आठ गावांचा संपर्क साधला जाणारे गाव आहे. अशा या धामोरी गावात विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर आहेत. विद्यालय ते बसस्टॅडं परिसरात असून तेथेच या मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट पहावयास मिळतो.त्याच परिसरातील गावातील व्यावसायीक,दुकानदार अक्षरशः मेटाकुटीस आले आहे. मद्यपान केलेल्या या रोडरोमिओंची तक्रार दाखल व नोदविण्यासाठी सर्वसाधारण माणूस तयार होत नाही. उगाचच कोर्ट कचेरी नको असे म्हणून दुर्लक्ष करतात.आणि त्याचाच फायदा हे मद्यपान केलेले रोडरोमिओं घेतात.
तरी संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक, पुठारी ,पोलीस पाटील,ग्रामपंचायत विकास अधिकारी ,पोलिस प्रशासकीय अधिकारी यांनी या मद्यपान रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी येथील व्यावसायीक, दुकानदार, महिला बचत गट व त्रास होणा-या धामोरी येथील नागरिकांमधून चर्चेचा विषय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here