येवला तालुक्यातील महालखेडे शिवारातील खूनाची उकल दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0
67

नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – दि. २१/०५/२०२५ रोजी येवला तालुका पोलीस ठाणे हद्‌दीत सत्यगाव, महालखेडा, कोपरगाव शिवारात ऊसाच्या शेतात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.सदरचा मृतदेह संतोष दत्त्तात्रेय शेळके दहिवाडी, ता. सिन्नर येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.यावरून सदर प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.स्थानिक गुन्हे शाखेने जागेची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली. खबऱ्या कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून विशाल रतन बागले वय 19 व गणेश भगवान सोनवणे वय 25 दोघे रा. चासनळी तालुका कोपरगाव येथील असून संशयीतांकडून वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता दोघांनी सदर युवकास उसाच्या शेतात डोक्यात दगड टाकून जीवे ठार केल्याची कबुली दिली आहे. सदर खून पूर्व वैमनस्यातून केला असल्याचे तपासात समोर आले आहे. या कामगिरीमुळे तालुका पोलीस ठाण्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here