भद्रावतीच्या मुख्य चौकात ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आमदार करण देवतळे यांना निवेदन

0
11

जनतेच्या हिताकरीता महत्वपूर्ण निर्णय होणार :- शिवसैनिक सुरज शाहा

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भद्रावती तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार मुख्य चौकातील वाढत्या वाहतुकीच्या आणि अपघातांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक सुरज शहा व सुमित हस्तक यांनी आमदार करण देवतळे साहेब यांना निवेदन दिले आहे.

सदर चौकातून कोळसा कंपनीसह अनेक अवजड वाहने नियमितपणे ये-जा करतात. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण येत असून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या मुख्य चौकात ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित करण्यात यावा आणि ट्रॅफिक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर आमदार करण देवतळे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून. त्यांनी सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून लवकरच यावर ठोस कार्यवाही होईल, असा विश्वास या बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक दीप गारघाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here