prabodhini news logo
Home ठळक बातम्या ग्रामीण भागातील मातिकलाकार वाल्मिक शिरसाठ प्रजापती भूषण पुरस्काराने सन्मानित

ग्रामीण भागातील मातिकलाकार वाल्मिक शिरसाठ प्रजापती भूषण पुरस्काराने सन्मानित

0
148

येवला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील ममदापुर येथील कुंभार व्यवसायिक (मतिकलाकार) वाल्मीक शिरसाठ, यांना संस्थेने आधुनिक ट्रेनिंग देऊन त्यांना एक यशस्वी उद्योजक घडवण्याचा बहुमान मिळविला आहे.त्यांना अखिल भारतीय प्रजापती महासंघाच्या वतीने प्रजापती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले व त्यांना सन्मानित केले.
अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ व अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देवाची आळंदी येथे मुंबई फ्रूटवाला धर्मशाळा येथे कुंभार/प्रजापती समाजाच्या मातीकला विकास चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्याच्या वतीने अखिल भा. प्र. कु.महासंघ नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष श्री. रंगनाथजी सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मातिकला सेलचे चेअरमन दत्ता कुंभार,नागनाथजी कुंभार, महादेवजी खटावकर यांच्या निदर्शनाखाली करण्यात आला. हा कार्यक्रम संतांच्या माऊलीच्या पावन भूमीत असल्याने या कार्यक्रमास खास महत्त्व होते,कार्यक्रमासाठी संपूर्ण भारत देशभरातून मोठ्या संख्येने कुंभार/प्रजापती समाजाचे समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय संयोजक आर. बी. के. प्रजापती, राष्ट्रीय अध्यक्ष सतीशजी कुंकळेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात जी काही आधुनिक क्रांतीची मशाल पेटवून महाराष्ट्र राज्यात कात टाकत चाललेल्या पारंपारिक मातीकामास आधुनिकतेची जोड देऊन नवी क्रांती करण्यात आली,या मशालीचा उजेड महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात पोहोचविण्यात विकास संस्थेने आजपर्यंत भरीव योगदान दिले त्याचेही सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाचे डायरेक्टर एस.पी.मिश्रा, जगभरात नाव कमावणाऱ्या तसेच आपल्या मातिकलेच्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मनसुखभाई प्रजापती तसेच तामिळनाडू येथील भगवतीचरण सर,ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, चेन्नई, मदुराई, युपी, बिहार, राजस्थान मातिकला बोर्डचे अध्यक्ष प्रल्हाद रॉय टाक, पंजाब, छत्तीसगड मातिकला बोर्डचे अध्यक्ष शंभूनाथजी,दिनेशजी अनावाडीया(पूर्व सांसद), गुजरात, परमिंदरजी (एम एल ए )गोवा, चंदीगड, या सर्व राज्यातून अखिल भारतीय संघटनेचे सर्व वरिष्ट पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र राज्यातील अखिल महाराष्ट्र कुंभार समाजा विकास संस्थेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत, विकास संस्थेचे सचिव मनोहरजी जाधव, ज्येष्ठ सल्लागार सोमनाथजी सोनवणे, संतोषजी पाषाणकर, राजेंद्र सावंदे, रामदास कुंभार(बीड), अशोक कुंभार (खेड), किसनजी काळे, के.एन.मोरे व त्यांची टीम, नाशिक जिल्हा अध्यक्ष नंदुभाऊ सोनवणे व येवला येथील टीम नीलेशजी सोनवणे,प्रल्हादजी सुर्यवंशी, मुंबई येथील शिल्पकार यमाजी श्रीमंदिलकर,विनायक श्रीमंदिलकर, तुळजापूर येथील भगवान नाझरेकर, येवला क्लस्टरचे सीडीए संदिपजी मोरे, आळंदी येथील ह.भ.प. वसंत महाराज सोमवंशी यांनी प्रामुख्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here