MESCO कडून १२५ हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

0
38

सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : मुस्लिम एज्युकेशनल सोशल अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन (MESCO) तर्फे ३१ मे २०२५ रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी हॉल, चंद्रपूर येथे १५० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात युवा क्रिकेटपटू हसनैन हकीम हुसैन याला विशेष सन्मान देण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जावेद पाशा उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. एम. जे. खान यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. डॉ. नसरीन मवानी आणि डॉ. अंजुम कुरैशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MESCO चे अध्यक्ष ॲड. फरहत बेग होते आणि सचिव हतीम कांचवाला यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. मंच संचालन तस्मिया बेग आणि इमास हुसैन यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

या यशस्वी आयोजनामागे अनेक समर्पित कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि योगदान होते. त्यामध्ये डॉ. एजाज शेख, रहमान पटेल, जाहिर काझी, नाहिद हुसैन, अहमद शेख, जुनैद खान, जुनैद सय्यद, इमरान सय्यद, एजाज खान, रिझवान सिवानी यांचा विशेष सहभाग होता.

विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध भागांतील शाखा प्रमुख व प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले. त्यामध्ये शिरीन कुरैशी (ब्रम्हपुरी), ताहिर भाई (बल्लारपूर), नजमुलहुडा शाहिद (वरोरा), शाहिद अली (भद्रावती), युनुस शेख (सिंदेवाही), तौसीफ शेख (मुल), अज़हर सिद्दीकी (राजुरा), महबूब भाई (जीवती), निसार शेख (कोरपना), मो. शफीक शेख (चिमूर) यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला हाजी अनवर अली, डॉ. कल्याण कुमार आणि टाइम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर श्री. मजहर अली यांसारख्या अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभली.

MESCO चा हा सत्कार समारंभ संस्थेची शिक्षणासाठी असलेली बांधिलकी आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा उद्देश अधोरेखित करणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here