प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्याने बाबूपेठ महिला बचत गट तथा रणरागिणी महिला पतसंस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,याप्रसंगी चंद्रपूर चे प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन मा.डॉ रुपेश ठाकरे, हिंदी सिटी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा.रोहिणी काटेखाये, योग शिक्षिका रेखा वैरागडे, कार्यक्रमाच्या संयोजक तथा बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा चंदाताई वैरागडे, बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी कंदलवार, सुवर्णा मत्ते, सुषमा पोटे, नीता चन्ने, सुवर्णा भारस्कर यांच्या आणि सर्व महिला सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले,,या प्रसंगी प्रस्ताविकेतून चंदाताई वैरागडे यांनी महिला बचत गट तसेच रणरागिनी पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात,त्याच अनुषंगाने आज पर्यावरण दिनी विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आणि त्याचे संगोपन सुद्धा आमच्या महिला भगिनी करणार आहे,पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगीआहे.
परंतु प्रदुषणामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे, त्यामुळे मानवी जीवनाला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे वृक्षारोपण करणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे मत मनोगतातून व्यक्त केले, प्रमुख अतिथी डॉ.ठाकरे यांनी प्रत्येकाने आपल्या किंवा आपल्या मुलाबाळांच्या वाढदिवसाला किंवा आपल्या जीवनातील महत्वाच्या दिवशी किमान एक तरी झाड आपल्या घरी किंवा सभोवताली लावून ते जगविले तर निश्चितच प्रदूषणावर मात करून आपले जीवन निरोगी राहील असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित महिलांनी वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी घेतली,कार्यक्रमाला बाबूपेठ महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला पतसंस्थेच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे थोडक्यात सूत्रसंचालन मेघा बजाईत तर आभार सुरेखा बुटले यांनी केले.

