गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक १९ जून २०२५ रोजी अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्ह्याचे निरीक्षक अॅड. सचिन नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामजी तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, अहेरी तालुका अध्यक्ष पप्पू हकीम, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, भामरागड तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी आणि अध्यक्ष अनुसूचित जाती किशोर शंभरकर, हनिफ शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिता कुसनाके, माजी सभापती भास्करजी तलाडे, संचालक मलकाअर्जुन आखुला, माजी उपसभापती गिता चातुरकर, माजी उपाध्यक्ष नगरपंचायत विष्णूजी मडावी, उपाध्यक्ष अल्पसंख्यक रिजवान शेख, शौभान कोडावार, अज्जु पठाण, गणेश उपलावार, उषाताई आत्राम, शाहजिदा पठाण यांची उपस्थिती होती.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील विविध काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, स्थानिक प्रश्नांची प्रभावी मांडणी आणि मतदारांशी सशक्त संवाद यावर भर देण्यात आला. पक्षशिस्त, गटबाजी टाळणे आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

