नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – दि. २१ जुन २०२५ आज कवी कुसुमाग्रज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निफाड येथे प्राचार्या सुनिता शिंदे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यात प्राणायाम, कपालभाती, अनुलोम – विलोम,शीर्षासन अशी विविध सर्व प्रकारची आसने योगेश महाले यांनी प्रशिक्षणार्थ्यांकडुन करून घेतली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन संस्थेतील सर्व कर्मचा-यांनी केले. आजच्या काळातील योग साधनेचे महत्त्व माननीय शिंदे यांनी सांगितले, यशंवत तेलोरे यांनी निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे व योग साधनेचे महत्त्व सांगितले व शारीरिक व मानसिक बदल सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसोबत संस्थेतील कर्मचाऱ्यांनी देखील सर्व योगासना केली. या कार्यक्रमाचा शेवट योग प्रार्थनेने केला.मा.प्राचार्या सौ सुनिता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कवी कुसुमाग्रज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निफाड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

