मोहाडी तालुक्यामध्ये देवाडा गावात आठवडी बैल बाजारात सर्रास जुगार चालतो तोही पोलीसाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या बाजारात

0
37

मोहाडी प्रतिनिधी – मोहाडी तालुक्यातील देवाडा गावात आठवडी बैल बाजार भरतो. तोही फक्त दर बुधवारला. या बाजारात खुलेआम जुगार चालतो आणि अनेकांना डाव साधून लुबाडण्यात येते .त्यामध्ये पोलीस चार आशीर्वाद असतो आणि त्याच बाजारात पोलिसांची उपस्थिती असते . कारण बैल बाजार असल्यामुळे लोकांचे अनेक वाद निर्माण होतात खरेदी विक्रीमुळे म्हणून पोलीस बंदोबस्त नेहमी बाजाराच्या दिवशी उपस्थित असतो. एवढेच नव्हे तर वैनगंगा नदीकाठी हा बाजार भरतो पोलीस पुलावर उभे राहून ज्या लोकांनी बैल जानवर खरेदी केले त्या प्रत्येक गाडीच्या मागे हे पैसे मागतात तेही हप्ता वसुली सारखे .जुगार हा जोराचा असतो कारण बैल घेणारा आणि विकणारा ह्या दोघांकडे पैशाची मोठी रक्कम असते पोलिसांच्या बंदोबस असल्यावर जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने चालते आणि विशेष म्हणजे भामटे एकमत करून बैल व्यापाराला मोठ्या सफाईने लुबाडून त्यांचे खिसे रिकामी करतात .हा देवाडा बाजार क्षेत्र मोहाडी तालुक्याच्या करडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो .लोकांचे जुगारामुळे रूपये गेले त्यांच्या घर परिवाराची मागणी आहे की ह्याकडे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हुसेन यांनी या आठवडी बाजाराच्या जुगारावर आळा घालावा आणि जे पोलीस उपस्थित असतानी असे कारभार होते. त्यां पोलिस कर्मचारी वर कारवाई करावी आणि आठवडी बाजाराची व्यवस्था सुरक्षित करावे. अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here