चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ ऊल्हारे-7744022677 – कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भवानी चौक येथील रात्री एका तरुणावर कोयता लोखंडी पाईप आणि बेसबॉल च्या दांडक्याने निर्गुण हल्ला करण्यात आला या हल्ल्यात रुपेश न्यानेश्वर गायकवाड वय 23 राहणार गांधीनगर हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी चार आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता घडली रुपेश गायकवाड भवानी चौक परिसरातून जात असताना अचानक हर्षल रोकडे रोहित कुंभारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे या चौघांनी त्याला अडवले हर्षल रोकडे ने गळा पकडून त्याला खाली पाडले आणि बेसबॉल च्या दांडक्याने बेदम मारहाण केली त्यानंतर इतर तिघांनी लोखंडी पाईप आणि धारदार कोयतेने रुपेशवर वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुपेश ला तात्काळ रुग्णालय दाखल करण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असल्या चे सांगण्यात आले रुपेश गायकवाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षल रोकडे रोहित कुंभारे गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधीक्षक तपास करत आहे.

