
पेशंट मधे भीतीचे वातावरण
संघर्ष भगत झरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – झरि तालुक्यातील मुकुटबन येथील सरकारी दवाखान्यात दिनांक 29 जून रोजी 1 वाजून 30 मिनिटांनी साप दिसल्याची माहिती पंकज कडूकर यांनी सर्पमित्र जगदीश कुडलवार यांना देण्यात आली.त्यांनी क्षनाचाही विलंब न करता तिथे हजर होऊन जवळ जवळ सात फुटाच्या धामण जातीच्या सापाला पकळले.विशेष मनजे सध्या पावसाळा सुरू झाला आहे अश्यातच सध्या आजारी रुग्ण जास्त येतात अश्यातच साप ऐन दवाखान्याच्या अंदर दिसल्याने हॉस्पिटल मधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धामण जातीच्या सापाला निसर्गरम्य परिसरात नोंद घेऊन सोडण्यात आले.यावेळी डॉक्टर ठावरी,रोहित पचेल,आकाश याटकर्लेवार,आणि आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते.















