चंद्रपूर – दि. ३० : मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत २७ मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी निश्चित करण्यात आली. ही बैठक भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, रविंद्र अनासपुरे, रणधीरजी सावरकर, राजेश पांडे, विजय चौधरी, माधवी नाईक तसेच विदर्भ संगठन मंत्री उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आज केली आहे.
नवीन नियुक्त मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1)बल्लारपुर शहर- ॲड रणन्जय सिंह
2)बल्लारपुर ग्रामिण- चंद्रकांत(पिंटु)देऊळकर
3)मुल शहर- प्रविण मोहुर्ले
4)मुल ग्रामिण- चंदु मारगोनवार
5)दुर्गापुर/उर्जानगर- श्रीनिवास जनगमवार
6)पोंभुर्णा- हरी पाटील ढवस
7)गोंडपीपरी – दीपक सातपुते
8)गडचांदूर शहर – अरुण तुकाराम डोहे,
9)राजुरा शहर – सुरेश हरी रागीट,
10)राजुरा ग्रामीण – वामन मारोती तुराणकर,
11) जिवती – दत्ता हरी राठोड,
12)कोरपना – संजय रामचंद्र मुसळे,
13)नंदोरी – मुधोली– दयानंद जांभुळे,
14)वरोरा शहर – संतोष पवार,
15)नागरी – सालोरी– राजेंद्र सवई,
16)भद्रावती शहर – सुनील नामोजवार,
17)बोर्डा- आबामक्ता – वंदना राजू दाते,
18)घोडपेठ- पाटाळा – श्यामसुंदर उरकुडे, 19)अर्हेरनवरगाव– सुधीर दोनाडकर,
20)तळोधी– हेमराज शांताराम लांजेवार,
21)नागभीड – संतोष विठ्ठल रडके,
22)चिमूर – गजानन गुडधे,
23) भिसी – नेरी – मनीष दत्तात्रय तूम्पलीवार,
24) सावली – किशोर भाऊराव वाकुडकर
25)ब्रह्मपुरी शहर – सुयोग वामनराव बाळबुधे
26)ब्रह्मपुरी ग्रामीण – ज्ञानेश्वर राजाराम दिवटे
27)सिंदेवाही – नागराज मुकुटराव गेडाम
यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हाध्यक्ष श्री हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवीन टीम प्रभावी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे माजी वने व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर,चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा,वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,आमदार किर्तीकुमार भांगडीया,आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, माजी आ.प्रा. अतुल देशकर, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, विजय राऊत, राजेंद्र गांधी,श प्रमोद कडु, रमेश राजुरकर,सौ.विद्याताई देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,भाजपा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गूरनुले,डाॅ.मंगेश गुलवाडे, श्री.विवेक बोढे आदींनी अभिनंदन केले आहे.

