
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे श्री. मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अनोख्या वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले दिनांक 5 जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर सोमनाथ भाऊ चांदगुडे सचिन चांदगुडे .महेश गाडे. भगीरथ गाडे. एकनाथ गाडे कैलास चांदगुडे माणिक चांदगुडे उपस्थित होते. प्रथम मान्यवर व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मांडवडे ए .आर.सर यांच्या हस्ते रुक्मिणी मूर्तीची पूजा करण्यात आली.विद्यार्थ्यांनी हातात झेंडे डोक्यावर तुळस. व विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती व लेझीम चे सादरीकरण केले व पारंपारिक वेशभूषेत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला सालाबाद प्रमाणे महाराष्ट्रात आषाढी वारीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पारंपरिक रीतीरीवाजांचे सादरीकरण करत वृक्षदिंडीचे वृक्ष हीच वारी वृक्ष हीच पुजारी झाडे लावा झाडे वाचवा असा संदेश दिला. प्रथम सकाळी विद्यार्थ्यांच्या वारीचे प्रस्थान होऊन गावातून भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विठ्ठल नामाचा एकच जयघोष होता. या पालखी मिरवणुकी त गावातील ग्रामस्थ . शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वादक, टाळकरी ,मृदुंग वादक व विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा अशा वेगवेगळ्या भूमिका मांडून पारंपारिक वारीचा अनुभव जिवंत केला. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए आर. पर्यवेक्षक दवंगे एस यु. मोरे आर के. सारबंदे एन एच. शेख आर .एन. सांस्कृतिक विभाग प्रमुख कुशारे डी एन. राऊत एस एल. नीलकंठ पी .ए. गोडे एस एम. बागुल जी एम. थोरात के जी. सोनवणे एस व्ही. गुंजाळ बी व्ही . माळी ए पी. कदम एन .आर. चौधरी एच. एस. कोल्हे एम. एल. भुजबळ पी .एच. गोपाली एस. के. कापडणीस एच .डी. लांडगे व्ही .एस. पेटारे ए .बी. काशीद एस.एस.-डोखे एन. ए.-सुपेकर जे.डी.-कांदळकर व्ही. ए.-कदम टी . ए.-गाडे ए .एम.-पवार एस. एस.-कापसे के.डी. कु. चांदगुडे टी. ए.या सर्व शिक्षक वृंदांनी सहभाग घेतला.















