prabodhini news logo
Home ठळक बातम्या कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे जागतिक कौशल्य दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची...

कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे जागतिक कौशल्य दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची जागृती

0
142

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – निफाड आज कवी कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे जागतिक कौशल्य दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाची जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या प्राचार्या सौ सुनीता शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मारुती सुझुकी शोरूमचे मॅनेजर सोपान बोडके व प्रमुख वक्ते स्वप्निल खंडागळे सेल्स मॅनेजर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील प्रशिक्षणार्थी निकिता निकाळे ,सुनील गोपाळ, मोहिनी जाधव कोपा प्रशिक्षणार्थी व जागृती रसाळ, सुशांत शिरसाट , वैष्णवी घोडे वीजतंत्री या प्रशिक्षणार्थ्यांनी जागतिक कौशल्य दिनानिमित्ताने आपले उत्कृष्ट मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला मार्गदर्शन वाय. के. तेलोरे यांनी केले. आजच्या युवकांचे देशाच्या विकासात असलेले स्थान याविषयी माहिती दिली. व्ही. के. गवळी यांनी आयटीआयमध्ये प्राप्त केलेल्या कौशल्यांच्या आधारे रोजगाराच्या असलेल्या संधी व स्वतः उद्योग निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. पी.बी संगमनेरे यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिकाऊ उमेदवारीचे महत्त्व सांगितले. जे. एस. फिरके यांनी आस्थापनेशी निगडित शिकाऊ उमेदवारीचे नियम याविषयी माहिती दिली. प्रमुख वक्ते स्वप्निल खडांगळे यांनी सर्व मुलांमध्ये आत्मविश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे. देशात युवकांची असलेली संख्या व स्थान याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला संस्थेतील आर. जे वायकुळे, के.डी सोनवणे, एस .आर .शिंदे, एस. एस. वाघ, डी. बी. फड, एस डी खळे, एस. एस वंजारी ,एस आर भालेराव , पी एस जाधव तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश महाले यांनी केले. आज जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला‌. या कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here