prabodhini news logo
Home ठळक बातम्या निफाड येथे कारगिल विजय दिवस साजरा

निफाड येथे कारगिल विजय दिवस साजरा

0
169

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – आज कवी कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राचार्य सुनीता शिंदे होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी सैनिक हवालदार प्रेमा भोर हे होते. ईश्वर उत्तम इस्ते व शेख इरफान माझीसैनिक हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीत ए मेरे वतन या समूहगीताने झाली. हर्षदा पातळे या मुलीने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.जागृती रसाळ या मुलीने देशावर आधारित व सीमेवरील सैनिकांवर आधारित तिरंगा व पत्र शेवटचे लिहीत आहे. या स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. वैष्णवी घोडे व दिपाली जाधव या मुलींनी ए मेरे वतन के लोगो हे गीत गायन केले‌. सीमेवरील सैनिकांवर आधारित आर्मी अॅक्ट शिवानी माळी वैष्णवी चव्हाण जागृती व हर्षदा यांनी सादर केला. कारगिल दिवस याविषयी माहिती यशवंत तेलोरे यांनी दिली .शेख इरफान यांनी प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या या युद्धाच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रेमा भोर यांनी सीमेवरील सैनिकांचे जीवन व त्यांचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमाचे वक्ते योगेश महाले यांनी कारगिल युद्धाची सुरुवात कशी झाली व भारताने युद्ध कसे जिंकले. याविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेच्या प्राचार्यांनी सर्व माजी सैनिकांचा बुके व शाल देऊन सत्कार केला. व सर्व कलाकृती सादर केलेल्या मुलींना बुके देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेतील वि.के गवळी, सौ.पी.बी संगमनेरे,आर. जे.वायकुळे,एस.वाय.राजोळे, एस. आर. शिंदे, डी.बी‌. फड, एम. आर जाधव,एस.एस वंजारी, एस.डी. वाघ, ए.डि. दरोगे, एस. आर. भालेराव व तांत्रिक विद्यालयाचे एम.के केदारे,के.एस चव्हाण, व्ही.सी काळे उपस्थित होते संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here