
आला नागपंचमीचा सण
झोका झाडाला बांधू या
चला चला ग सख्यानो
नाग राजाला पुजूया
नैवेद्याला दूध आणि लाह्या
नागवेल फुलपाने वहाया
दारी रांगोळी नक्षीदार
रंग आनंदात रंगाया
करू पूजन भक्तीभावाने
मागू आशीर्वाद प्रेमाने
माझ्या कुटुंबाचा आनंद
अक्षय राहो तुमच्या कृपेने
हळदी कुंकवाच्या रेघा
शुभ संकेत दावीती
आम्रपानांचे तोरण
मांगल्य घेऊन येती
कर रक्षण सर्वांचे
तूच माझा भाऊ राया
दीप धूप ओवाळीते
सर्वांवरी ठेव कृपा छाया
सौ. वंदना पाटील, मुंबई















