
संदीप अवधुत नाशिक – काही ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन रक्कम गायप करण्याचे प्रकार समोर येत असताना, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील मुंडेगाव ग्रामपंचायतीत ४१,१४,९९६/- रुपयांचा अपहार ग्रामसेवकाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र विठ्ठल अहीरे (विस्तार अधिकारी,) पंचायत समिती इगतपुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी ग्रामसेवक प्रमोद सिताराम ठाकरे (सध्या सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर) येथे कार्यरत. हे वर्ष २००४ ते २०१७ या कालावधीत मुंढेगाव ता. इगतपुरी येथे कार्यरत असताना, मुंडेगाव ग्रामपंचायत साठी विविध विकास कामे करणे करीता शासन स्तरावरील प्राप्त निधी व स्व निधी मधून उप अभियंता इमारत व दळणवळण उपविभाग इगतपुरीचे रक्कम रुपये ३४ लाख ५७ हजार ७२६/- रुपये तसेच उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठाची रक्कम रुपये ६ लाख ५७ हजार २७०/- रुपये असा एकूण ४१ लाख १४ हजार ९९६/- रुपयांचा विविध विकास कामाच्या निधीचा उप. अभियंता पंचायत समिती इगतपुरी यांचे मूल्यांकनाशिवाय अपहार केला,
या प्रकरणाची नाशिक पंचायत समिती च्या चौकशी समितीने चौकशी करून यात संबंधित ग्रामसेवकाने अपहार केल्याचे दिसून आले, म्हणून आरोपी ग्रामसेवक यांच्यावर घोटी पोलीसात आयपीसी ४०९, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४० (५) अन्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पो.उप. निरीक्षक प्रतिक भिंगारदे करीत आहेत.















