
नकुल निरंजन कांबळे
युवा विचारवंत, चंद्रपूर
9112888960
“वेश्या व्यवसाय नाही, ती एक समाजसेवा आहे!”
आजच्या समाजात वेश्यांबाबत अनेक अपप्रचार, गैरसमज आणि घृणा पसरलेली आहे. पण जर आपण डोळसपणे विचार केला, तर लक्षात येईल की त्या महिला समाजासाठी एक अदृश्य आणि महत्त्वाचं काम करत आहेत.
समाजाला ‘त्या’ महिलांची गरज का आहे?
आज समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून (Instagram Reels, YouTube Shorts, Snapchat) अश्लीलतेचा विळखा लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पोहोचला आहे. मोबाईल, इंटरनेटमुळे सेक्सुअल कंटेंट सहज उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच लहान वयातच मुलांमध्ये असंवेदनशील विचार, लैंगिक आकर्षण आणि अयोग्य वर्तन वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर जर वेश्या व्यवसाय नसलं असतं, तर ही लैंगिक ऊर्जेची घातक परिणती अनेक घरांमधील महिलांवर अत्याचाराच्या स्वरूपात झाली असती.
वेश्यांचा अस्तित्व हा अनेक निष्पाप महिलांच्या अब्रूचं रक्षण करत आहे — अप्रत्यक्षपणे का होईना, पण ही समाजसेवा नाही का?
वेश्यांचं जीवन – एक सत्य
त्या देखील ‘आई’ आहेत, ‘ताई’ आहेत.
त्यांचंही एक कुटुंब असतं, जबाबदाऱ्या असतात.
काही जण स्वतःहून तर काहींची जबरदस्तीने ही वाटचाल सुरू होते.
पण प्रत्येकजण केवळ दोन वेळच्या जेवणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, कर्ज फेडण्यासाठी ही झुंज देत असतो.
धन्य आहेस ताई!
“तू स्वतःच शरीर विकून दुसऱ्यांच्या बहिणींची अब्रू वाचवतेस.
तुझ्या वेदना आम्हाला कधी उमगणार नाहीत, पण आज तुझं कार्य पाहून तुला सलाम करतो.”
तू “धंधा” नाही करत, तू “समाजसेवा” करतेस.
तू कुणासाठी ताई आहेस, कुणासाठी माई आहेस.
किती छळ, किती वेदना तू सहन करतेस — पण समाज अजूनही तुला घृणित नजरेनेच पाहतो…















