
‘सिंगल विंडो स्कीम’ अंतर्गत परवानगी व्यवस्था
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे मोजीस परमार mojissports@gmail.com 8104170564 – मीरा भाईंदर – गणेशोत्सव २०२५ च्या तयारीसंदर्भात महापालिका आयुक्त आणि प्रशासक राधाबिनोद ए. शर्मा यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे उच्च अधिकारी, पोलिस प्रशासन, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलिस प्रशासन, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभागाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले, मंडप बांधण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे, ‘सिंगल विंडो स्कीम’ अंतर्गत यासाठी मोफत परवानगीची व्यवस्था करणे, शहरातील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांची स्वच्छता,
सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे, पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देणे, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. आयुक्त शर्मा यांनी गणेश मंडळे आणि नागरिकांना महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, अशोक विरकर, कल्पिता पिंपळे, डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, दीपक खांबित, सोहेल शेख, प्रभाग १ ते ६ चे सहाय्यक आयुक्त आणि सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.















