
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा शालेय साहित्य वाटप उपक्रम
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शेवगाव – “समाज बदलायचा असेल तर शिक्षण हवे, आणि शिक्षणासाठी साधने हवीत…” हा विचार डोळ्यांसमोर ठेवून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन शेवगाव तालुक्याचे कर्तृत्ववान तालुका प्रमुख विकास शेलार यांनी केलं असून, त्यांच्या पुढाकाराने अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या, पेन, पेन्सिल, आणि आवश्यक शालेय साहित्य पोहोचले.

मा. राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य, योगेश भैय्या कदम राज्य सचिव यांचे मार्गदर्शन, आणि राज्य लिगल सेल सचिव ॲड. आदर्श भैय्या जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते यांचे सर्वांचे मार्गदर्शक लाभले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित लहुजी वस्ताद साळवे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शरद शेलार, पिंगेवाडी गावचे उपसरपंच चाँद भाई शेख ह.भ.प. अनिल महाराज मुंढे मा.शाळा समिती अध्यक्ष मच्छिंद्र जायभाये या.जिल्हा चिटणीस भाजपा किरण वाघ, शेवगाव तालुका युवक आघाडी कार्यध्याक्ष संकेत तानवडे, पिगेवाडी सोसायटी चेअरमन उद्धव भाऊ वाघ, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास शेलार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.
हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे एक ठाम सामाजिक दायित्व आणि गरिबीच्या अंधारात अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उजेड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता.
विद्यार्थ्यांचे टवटवीत चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांतील आशेची झलक पाहून या उपक्रमाचे खरे यश अधोरेखित झाले. शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सामाजिक जाणीवेचे मनःपूर्वक कौतुक केले.
अण्णाभाऊ साठेंचा लढा हा फक्त शब्दांत नव्हता, तो कृतीत होता. आणि आज त्या कृतीची जाणीव या सामाजिक उपक्रमातून ठळकपणे दिसून आली.















