prabodhini news logo
Home कोरची जिल्हा परिषदेचे खड्डे नगरपंचायत ने बुझविले

जिल्हा परिषदेचे खड्डे नगरपंचायत ने बुझविले

0
141

दरवर्षी निर्माण होणाऱ्या खड्यांमुळे नागरिक त्रस्त

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कोरची : तालुका मुख्यालयच्या मुख्य रस्त्यावर दरवर्षी पावसाळा पूर्वी मोठमोठे खड्डे निर्माण होत असल्यामुळे याचा प्रचंड फटका व नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो यामुळे कधी पण अपघात होण्याची शक्यता सुद्दा नाकारता येत नाही. सदर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुझविण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी नागरिकांतर्फे करण्यात येत असून सुद्धा याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे नगरपंचायत कोरची ने सदर खड्डे बुझवायला सुरुवात केली असून जिल्हा परिषदेचे खड्डे बुझविण्याचे कार्य नगरपंचायत करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या रस्त्याला नगरपंचायत कडे सोपविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून नगरपंचायत कोरची तर्फे करण्यात आली आहे.
कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ बघितली जाते व निर्माण होणाऱ्या खड्यामधून वाहने चालवीतना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून नगरपंचायत कोरची तर्फे खड्डे बुझविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here