
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – स्थानिक बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 मधील आंबेडकर चौक ते हनुमान मंदिर पर्यंत दाट वस्ती आहे. त्यांच्या घरावरील अगदी छताला लागून महावितरण विभागाची हाय होल्टेज तार गेल्यामुळे अनेकांना यापूर्वी करंट लागून जीविताला धोका निर्माण झाला आहे .आता पावसाळा सुरू असल्यामुळे संपूर्ण घराला करंट येऊन जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे तात्काळ वरील प्रभागातील घरावरील हाय होल्टेज तार हटविण्यात यावे.अशी मागणी चर्चे अंतर्गत संबंधित कार्यकारी अभियंतानी बाबुपेठ आणि चंद्रपूर शहरात अश्या अनेक धोकादायक हाय होल्टेज तार हटविण्याच्या निविदा तयार असून पुरेसा निधी नसल्याने काम प्रलंबित असल्याचे समजले,स्थानिक लोकप्रतिनिधीनी या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. तरी चंद्रपूर शहर जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष सौ चंदा ताई वैरागडे यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालय बाबूपेठ येथे निवेदन देऊन तार हटविण्याची मागणी केली. अन्यथा कोणतीही जीवित हानी झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला…















