prabodhini news logo
Home भंडारा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – रक्षाबंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – रक्षाबंधन

0
161

रेशमाचे हे बंध फक्त नाते जोडत नाही तर भावना, आठवणी आणि प्रेमाची नाजूक विण गुंफतो. भावा-बहिणीच्या नात्यातील निखळ प्रेमाचा विश्वास व आपुलकीचा सण म्हणजे राखी, या नात्यामधिल भावना शब्दात व्यक्त करण्यापेक्षा हृदयातून त्या भावनेचे पावित्र्य आणि जिव्हाळा दिसून येतो. बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेली ‘दोन शब्द ‘असलेली राखी बहिणीची भावाप्रती असलेली ओढ व निस्सीम प्रेमाची कबुली देते आणि भावाच्या मनातील जबाबदारीची जाणीव शब्दांपेक्षा हृदयातून, डोळ्यातून व्यक्त होते. त्या भावनेला उपमा नाही. ‘बहिणीने भावाच्या संरक्षणासाठी बांधलेली राखी आणि राखीचं पावित्र्य, बहिणीला दिलेले आयुष्यभर रक्षणाचे वचन एक आत्मविश्वास,आधार आणि खोल प्रेमाची साक्ष आहे’.भावा बहिणीच्या नात्याचा हा सण भाऊ-बहीण लहान असोत की मोठे भावना मात्र तिच अपरिमित प्रेम,काळजी आणि विश्वास दाखवणारी या नात्याला अधिक दृढ,सुंदर आणि भावस्पर्शी बनविणारी.
हा सण फक्त रेशमी धाग्याचा नाहीतर एकमेकांच्या जीवनात कणखर घट्ट आधार बनण्याचा आहे. एकमेकांचे स्वप्न आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पूर्ण करण्याचे हे बंध आहे. राखी फक्त भावासाठीच नाही तर मित्र, गुरुजन आणि सीमेवर देशाचे व आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही बांधली जाते कारण रक्षण आणि प्रेम ही भावना कुठल्याही नात्यांच्या मर्यादेमध्ये अडकलेली नसते, राखी ही हातावर बांधली जाते पण त्याबद्दल असणाऱ्या भावना हृदयात खोलपर्यंत जपल्या जातात भावा बहिणीचं नातं अधिकच दृढ करण्यासाठी…….

‘राखी फक्त धागा नाही
तो तर विश्वास आहे बहिणीचा
आयुष्यभर रक्षणासाठी उभा भाऊ
स्वाभिमान आहे तिच्या मनाचा’

डॉ. स्मिता गजभिये /तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here