prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

0
124

सण हा पुनवेचा
दिवस बहीण भावाचा
आरती ओवाळून भावा
बांधे रक्षणाचा धागा …

भाऊ सीधा साधा
बहीण म्हणते दादा
कधीन येऊ रागा
बांधे रक्षणाचा धागा …

दुःखात बंधू राजा
घेतो बाबाची जागा
सुखात नसतो मागे
वाजवितो ढोल ताशा …

बहीण येती घरा
थयथय नाचते दारा
जसा आनंदाचा वारा
घरात पसरविते सारा…

भावा बहिणीच नातं
एका उदाराची गाठ
संकटावर करते मात
अशीच असते साथ

असाच यावा सण
घरात मिळावे मन
भावाने ठेवावी जाणं
बहिणीचा करावा मान …

योगेश तांदुळकर
पाटणसावंगी, सावनेर
नागपूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here