prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

0
111

बहिणीची असते,
भावावर अतुट माया l
मिळो त्याला नेहमी,
अशीच प्रेमाची छाया ll

भावाची असते,
बहिणीला साथ l
मदतीला देतो ,
नेहमीच हात ll

बहिण भाऊ म्हणजे
एक दुसऱ्यासाठी जळणारी वात l
एकमेकांच्या अडीअडचणीवर,
होणारी मात ll

बहिण भावाचे प्रेम,
काळीज भरून उरतं l
भावाचा फोन येता,
बहिणीचं न जेवताच पोट भरतं ll

बहिण भावाची माया
गगनात मावणारी नसते l
आपल्या पाठीमागे भावाचं नाव,
शाबूत ठेवते तिचं नाव बहीण असते ll

दत्तात्रय शिंदे, सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here