prabodhini news logo
Home चंद्रपूर क्रांतीदिनी कामगार कल्याणच्या समरगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक नगीनाबाग वसाहत चंद्रपूर

क्रांतीदिनी कामगार कल्याणच्या समरगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक नगीनाबाग वसाहत चंद्रपूर

0
103

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग, गट कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत ललित कलाभवन, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे गटस्तरीय समरगीत/ स्फूर्तीगीत स्पर्धा दि.9 ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त संपन्न झाली. सदर स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मा. श्रीराम पान्हेरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त चंद्रपूर, मा. सुरेश तुम्मे गुणवंत कामगार, मा. देवराव कोंडेकर गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त ,मा. रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारीचंद्रपूर व परीक्षक यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
या समरगीत/स्फूर्तिगीत स्पर्धेमध्ये चंद्रपूर,वर्धा व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमधून एकूण 10 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर, कामगार वसाहत बल्लारपूर, कामगार कल्याण केंद्र गडचिरोली ,कामगार कल्याण केंद्र वर्धा, कामगार वसाहत शिंदी मेघे वर्धा, कामगार कल्याण केंद्र हिंगणघाट, कामगार कल्याण केंद्र मुल रोड चंद्रपूर, कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर, ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर, नगीनाबाग वसाहत चंद्रपूर हे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक नगीनाबाग वसाहत चंद्रपूर यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर यांनी व तृतीय क्रमांक कामगार वसाहत सिंदी मेघे वर्धा यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. स्मिता गोपाल सुतवणे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर, प्रमुख पाहुणे मा. दिनकर मशाखेत्री यांची उपस्थिती होती.
गुणवंत कामगार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण परीक्षक मा. उपेंद्र वनकर, मा. सारिका मनोजराव चांदेकर, मा. सुरज हनुमंत गडपेल्लीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी तर सूत्रसंचालन देवेंद्र दत्त, कल्याण निरिक्षक ललित कला भवन चंद्रपूर व आभार प्रदर्शन श्रीमती किरण उपरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रपूर गटातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here